खेड : तालुक्यातील मोरे स्मार्ट समोर मुंबई-गोवा हायवे रोडवर १२ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात मोहम्मद जुनेद अन्सारी (वय २२, रा. कामाक्षी पेट्रोलियम, खेड) हा जखमी झाला आहे.
याबाबत मोहम्मद साहिल (मो. अस्लम) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, मोहम्मद जुनेद अन्सारी चायनीज घेण्यासाठी शिवकृपा चायनीज सेंटर येथे जात असताना, पाठीमागून आलेल्या हिरो स्प्लेंडर (एम.एच.वाय.एच. २५५७) या दुचाकीवरील चालक आदित्य साळुंखे (रा. कणसकोंड, पोलादपूर) याने धडक दिली. या अपघातात जुनेद अन्सारी याच्या डोक्याला दुखापत झाली असून, गाडीचेही नुकसान झाले आहे. खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
खेडमध्ये मोटरसायकल अपघातात तरुण जखमी
