सहाव्या वर्षी समाजोपयोगी व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी
लांजा : क्षत्रिय मराठा गृप सुर्वे बंधु यांच्या वतीने भैरी भवानी नवरात्र उत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून, दर तिन वर्षाने देवीजवळ संकल्प केला जातो त्या प्रमाणे यंदा तिसरे वर्षे व स्थापना केल्याप्रमाणे सहावे वर्षे आहे यापूर्वीच्या पाच वर्षांप्रमाणे यंदाही देवीची स्थापना उत्साहात करण्यात येणार आहे. यावेळी मंडळाने धार्मिकतेबरोबरच समाजोपयोगी व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे समृद्ध नियोजन केले आहे.
या आठवडाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये—
रत्नागिरीचे प्रसिद्ध भजनी बुवा लोकेश सागवेकर, लोकप्रिय यूट्यूबर भजनी बुवा संदीप पावसकर, तसेच कोट येथील भजनी बुवा कुमारी सिद्धी पाष्टे यांची विशेष भजने व कीर्तन सेवा
कोट पंचक्रोशीतील गावांसाठी फुगडी स्पर्धा
कोट गावातील महिलांसाठी लोकप्रिय होम मिनिस्टर स्पर्धा
जनसेवेसाठी रत्नागिरीचे डॉ. लोटलीकर यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबीर
शासनाच्या नोंदणीकृत कामगार योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबीयांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर
पारंपरिक देवीचा गोंधळ, कोट दोन आंबा वारकरी भजन
अशा विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचा समावेश आहे.
या उत्सवाला लांजा-राजापूरचे लोकप्रिय आमदार भैयाशेठ सामंत, उद्योजिका शिल्पा सुर्वे, उद्योजक दादा पत्याणे, उद्योजक बंडुशेठ पत्याणे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
क्षत्रिय मराठा ग्रुप सुर्वे बंधुंकडून आजपासून भैरी भवानी नवरात्र उत्सव
