GRAMIN SEARCH BANNER

दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ साळवी नगर गोळप सडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Gramin Varta
113 Views

रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील गोळप सडा येथील दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाने यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नवरात्रीच्या उत्साहाला साजेशी भव्यता या कार्यक्रमांना लाभली असून, यात भजन, गोंधळ, दांडिया आणि विविध स्पर्धांचा समावेश आहे.

या उत्सवाचा प्रारंभ २६ सप्टेंबर रोजी रात्री १०.३० वाजता बुवा संदीप लोके आणि बुवा गुंडू सांवत यांच्यातील भजनांच्या जंगी सामन्याने होणार आहे. हा सामना भजनाच्या २०-२० स्पर्धेसारखा असून, यामध्ये दोन्ही बुवा आपली कला सादर करतील. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गोंधळ आणि जोगवा मागण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल, त्यानंतर रात्री ७.३० वाजता दिवटी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याच रात्री १० वाजता गोंधळाची कथा सादर केली जाईल.

२८ सप्टेंबर रोजी महिलांसाठी खास कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. दुपारी ४ वाजता हळदी-कुंकू समारंभ होईल आणि सायंकाळी ६ वाजता ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा रंगणार आहे. रात्री ९.३० वाजता दांडिया रासचा उत्साह संचारेल. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पाककला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांच्या माहितीसाठी केतन झगडे (मो. ९४२१७०७५८९) यांच्याशी संपर्क साधता येईल. रात्री ९.३० वाजता पुन्हा दांडिया रासचा जल्लोष होईल.
३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता होम-हवन आणि कुमारी पूजन केले जाईल. त्यानंतर रात्री १० वाजता ५ ते २० वयोगटातील मुलांसाठी डान्स स्पर्धा आयोजित केली आहे आणि रात्री ११ वाजता पुन्हा दांडिया रास होणार आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप होईल. रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभानंतर, रात्री ११ वाजता शक्ती तुऱ्यांचा जंगी सामना रंगणार आहे. यात रायगडचे शाहीर योगेश जाधव आणि शाहीर तेजल पवार यांच्यात तुफान लढत पाहायला मिळेल.

२ ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या निमित्ताने सायंकाळी ५.३० वाजता मंदिरामध्ये सोन्याचे वाटप केले जाईल. सायंकाळी ७ वाजता आरती आणि रात्री ९.३० वाजता दांडिया रास होईल. उत्सवाचा शेवट ३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता आरती आणि गाऱ्हाण्याने होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता देवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली जाईल आणि रात्री ७.३० वाजता अंतिम आरती होईल.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळ, साळवी नगर, गोळप सडाच्या अध्यक्षा सौ. नेहा आनंद साळवी यांनी केले आहे.

Total Visitor Counter

2648199
Share This Article