GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : सावर्डेतून कोल्हापूरला गुरांना कत्तलीसाठी नेणारी गाडी पकडली; ग्रामस्थांच्या तीन दिवसांच्या पाळतीनंतर वाहनचालक ताब्यात

Gramin Varta
566 Views

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

सावर्डे/ समीर शिगवण: चिपळूण तालुक्यातील एका गावातून सुरू असलेल्या गुरांच्या चोरट्या वाहतुकीवर सावर्डे येथील गोरक्षकांनी तीन दिवस पाळत ठेवून मोठी कारवाई उघड केली आहे. मागील काही दिवसांपासून एकच नंबर प्लेट असलेली संशयित गाडी रात्रीच्या वेळी गोमाता घेऊन कोल्हापूरकडे कत्तलीसाठी जात असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती.

या माहितीनंतर ग्रामस्थांनी सलग तीन रात्री पाळत ठेवत संशयित वाहनाचा मागोवा घेतला. आज पहाटे साधारण ३ वाजण्याच्या सुमारास शिंदे–आंबेरी परिसरात ही गाडी दिसताच ग्रामस्थांनी ती अडवून जेरबंद करण्यात यश मिळवले. वाहनात गुरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत स्वरूप रविंद्र साळवी, ऋषिकेश खानविलकर, अजय जाधव, मिलिंद चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तत्काळ ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन वाहन, चालक आणि गुरे ताब्यात घेतली. याप्रकरणी आवश्यक तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

गावकऱ्यांची सतर्कता आणि पोलिसांचे तात्काळ सहकार्य यामुळे गावातून सुरू असलेली गुरांची चोरीची वाहतूक मोठ्या प्रमाणात रोखण्यात यश मिळाले आहे.

Total Visitor Counter

3199485
Share This Article