GRAMIN SEARCH BANNER

लांजा नगरपंचायतीच्या मतदार याद्यांवरील हरकतींसाठी मुदतवाढ

Gramin Varta
109 Views

लांजा : येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमधील हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी चार दिवसांनी वाढविण्यात आला आहे. आता नागरिकांना शुक्रवार, १७ ऑक्टोबरपर्यंत हरकती आणि सूचना सादर करता येणार आहेत.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही नगरपंचायत कार्यालय खुले ठेवण्यात आले होते, जेणेकरून नागरिकांना हरकती व सूचना देणे सुलभ होईल.

मूळतः हा कालावधी बुधवार, ८ ऑक्टोबर ते सोमवार, १३ ऑक्टोबर असा ठेवण्यात आला होता; मात्र नागरिकांच्या सोयीसाठी तो शुक्रवार, १७ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत हरकती स्वीकारण्यात येतील.

तसेच, प्राप्त सर्व हरकतींचा निपटारा करून अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार होत्या, त्या आता शुक्रवार, ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3377770
Share This Article