भरणे जगबुडी पुलावर कार उलटली; सुदैवाने जीवितहानी टळली

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

खेड: मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथील जगबुडी पुलावर शनिवारी दुपारी सुमारे 3.30 वाजता एक कार अपघातग्रस्त होऊन उलटली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

एम.एच. 08 बी.ई. 3979 क्रमांकाची कार जगबुडी पुलावरून मार्गस्थ असताना अचानक नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलालगत असलेल्या भिंतीवर आदळून उलटली. अपघाताची तीव्रता मोठी असली तरी सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

मात्र अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेनंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *