GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : ईव्हीएम बंद पडले; सावर्डेत गोंधळ; मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजी

Gramin Varta
186 Views

सावर्डे (विनायक सावंत) : चिपळूण तालुक्यातील सावर्डे पंचक्रोशीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असतानाच ईव्हीएम मशीन बंद पडल्याची घटना घडली. सावर्डे कॉलनी हा आमदारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा भाग असून येथे अवघ्या ३२ मतांचे मतदान झाल्यानंतर अर्ध्या तासातच मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला.

ईव्हीएम अचानक बंद पडल्यामुळे मतदानाचा उत्साह मावळला असून अनेक मतदार निराश होऊन मतदान न करताच परतल्याचे चित्र दिसून आले. कॉलनी पोलीस लाईन सावर्डे, पिंपळ मोहल्ला सावर्डे, कुडप गाव तसेच कोंडमळा येथील मतदान केंद्रांवरही ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदानावर परिणाम झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
सुमारे दोन तासांनंतर मशीन बदलण्यात आले असले तरी तोपर्यंत अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून कार्यकर्ते आणि नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत. प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Total Visitor Counter

3344413
Share This Article