GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुक्यात ‘गाव विकास समिती’ने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवाव्यात

Gramin Varta
69 Views

गाव विकास समितीच्या निवडणूक निर्णय कमिटीची सूचना

गाव विकास समितीचे नेतृत्व पराभवाची चिंता न करता पैशांच्या राजकारणासमोर विकासाचे मुद्दे मांडत लढणारे-सुरेंद्र काब्दुले

संगमेश्वर: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ‘गाव विकास समिती’ ने  विकासाच्या मुद्द्यावर लढवावी अशी सूचना गाव विकास समितीने याबाबत नेमलेल्या निवडणूक निर्णय कमिटीने संघटनेच्या नेतृत्वाला केली आहे.

अलीकडे राजकारणात वाढत असलेल्या पैशांच्या प्रभावाचा मुकाबला करण्यासाठी सामान्य माणसांचा आवाज म्हणून निवडणुका लढवण्याबाबत निवडणूक निर्णय समितीने सकारात्मक अहवाल सादर केला आहे.

सुरेंद्र काबदुले, राहुल यादव, मंगेश धावडे,मुझमिल काझी आणि महेंद्र घुग यांचा समावेश असलेल्या या निवडणूक निर्णय कमिटीने दोन महिन्यांच्या सखोल अभ्यासानंतर आपला अहवाल गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांना दिला आहे.

पैशांच्या राजकारणाला विकासाचे उत्तर:

या अहवालानुसार, ‘गाव विकास समिती’ने आपल्या वैचारिक भूमिकेवर आणि गावांच्या विकासावर कोणतीही तडजोड न करता निवडणुका लढवाव्यात, अशी शिफारस करण्यात आली आहे. “निवडणुकीत जय-पराजय होतच असतो, म्हणून लढणे सोडून देण्याऐवजी, पैशांच्या ताकदीपुढे न झुकता केवळ गावांच्या विकासाचे प्रामाणिक व्हिजन घेऊन निवडणुका लढवाव्यात,” असे समितीने म्हटले आहे.

‘गाव विकास समिती’चे नेतृत्व स्वाभिमानी असून ते पैशांच्या राजकारणापुढे झुकणार नाही.गाव विकास समितीचे नेतृत्व पराभवाची चिंता न करता पैशांच्या राजकारणासमोर विकासाचे मुद्दे मांडत लढणारे असल्याचे सुरेंद्र काबदुले याबाबत बोलताना म्हणाले.ही संघटना केवळ पराभवाने खचून न जाता, लोकांना खऱ्या लोकशाहीचे आणि विकासाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये केवळ गावांच्या विकासाचे व्हिजन घेऊनच समितीने पुढे जावे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
या अहवालानंतर आता अध्यक्ष उदय गोताड आणि संघटन प्रमुख सुहास खंडागळे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच, संगमेश्वर तालुक्यातील कोणत्या जागांवर ही समिती निवडणूक लढवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Total Visitor Counter

2651758
Share This Article