संगमेश्वर :संगमेश्वर तालुक्यातील कोंड-असुर्डे येथील जांभुळवाडी गावात नवरात्रोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. महालक्ष्मी जाखमाता पावणाई देवीच्या नवरात्र उत्सवासाठी गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असून पारंपरिक पद्धतीने देवीची स्थापना करण्यात आली आहे.
महालक्ष्मी विकास मंडळाच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा होत आहे. देवीच्या आगमनापासून नऊ दिवसांचा सप्ताह आयोजित करण्यात आला असून दररोज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत.
मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सकाळपासून पुरुष व महिलांसाठी खास उपक्रम तसेच ऐक्याचा विशेष कार्यक्रम होणार आहे. सर्व ग्रामस्थ आणि भक्तांनी या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महालक्ष्मी विकास मंडळ जांभुळवाडी यांनी केले आहे.
कोंड-असुर्डे जांभुळवाडी येथे नवरात्र उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम
