चिपळूण : तालुक्यात खेर्डी एम.आय.डी.सी. कराड हायवेवरील वशिष्ठी डेअरीसमोर काल, शुक्रवार, १९ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रकने हायमस्ट लाईटच्या पोलला धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात पोलचे आणि ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समरस बहादूर शेख ते खेर्डी एम.आय.डी.सी. कराड हायवेवरून आत येत असताना, एम.आय.डी.सी. खेर्डी येथील वशिष्ठी डेअरीसमोर (एम.एच.२४.ए.यु.६२०५) ट्रक भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे चालवत आरोपी विक्रम सुनील घुले (वय २५, रा. टाकळी, ता. केज, जि. बीड) याने हायमस्ट लाईटच्या पोलला जोरदार धडक दिली.
या घटनेची तक्रार किरण विश्वनाथ गवळी (वय २७, रा. खेर्डी एम.आय.डी.सी कॉलनी, रूम नं. १०, खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलिसांत दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, विक्रम घुले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
चिपळूणमध्ये भरधाव ट्रकची विजेच्या पोलाला धडक; चालकाविरोधात गुन्हा दाखल
