देवरुख: देवरुख परिसरात खळबळ उडवणारी घटना बुधवारी रात्री घडली. सोने व्यावसायिकाला 2 कार मधून आलेल्या 10 जणांनी सोन्या चांदीचे दागिने साडेसोळा लाखांचे दागिने लुटून फरार झाले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवरुख पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की धनंजय गोपाल केतकर (63, मार्लेश्वर फाटा देवरुख ) हे सोने व्यावसायिक बुधवारी रात्री आपल्या चारचाकी गाडीतून साखरपाहून देवरूखच्या दिशेने येत होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास वांझोळे येथे दोन गाड्यातील 10 जणांनी उतरून त्यांची गाडी अडवली. दरोडेखोरांनी त्यांना गाडीतून बाहेर काढून मारहाण केली. हा मारहाणीत त्यांना जबर दुखापत झाली. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून त्यांना गाडीत कोंबले आणि राजापूरच्या दिशेने गाडी गेली. राजापूर वाटूळ येथे त्यांना सोडून त्या दोन गाड्या पुढे मार्गस्थ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सोन्याची जेंट्स चेन 125 ग्रॅम, अंदाजे किंमत ₹14,00,000,
चेन (70 ग्रॅम पैकी 14 ग्रॅम शुद्ध सोने) व 56 ग्रॅम इतर धातू – ₹1,50,000,जेंट्स चेन 5-6 ग्रॅम – ₹50,000,भारतीय चलनी नोटा ₹500 च्या 40 नोटा – ₹20,000
एकूण अंदाजे ₹16,20,000 किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 311, 309(4), 310(1), 140(2), 127(2), 115(2), 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास देवरुख पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Update: देवरुख परिसरात दरोडा; 2 कार मधील 10 जणांच्या टोळक्याने व्यावसायिकाला साडेसोळा लाखांना लुटले
