GRAMIN SEARCH BANNER

लांजात उद्या राज्यस्तरीय चिखलणी स्पर्धा

ठाकरे शिवसेना युवासेना रिंगणे तर्फे आयोजन, खिल्लार गटात प्रथम क्रमांकाला 25 हजार, गावठी गटात 15 हजाराचे बक्षीस

लांजा : तालुक्यातील शिवसेना युवासेना शाखा- रिंगणे यांच्यावतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता राज्यस्तरीय चिखलणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन हभप एकनाथ कृष्णजी आयरे यांच्याहस्ते होणार आहे. खिल्लार गटात प्रथम क्रमांक 25 हजाराचे पारितोषिक, द्वितीय क्रमांक 20 हजार, तृतीय क्रमांक 15 हजार असे बक्षीस आहे. तर गावठी गटात 15 हजार, द्वितीय क्रमांक 11 हजार, तृतीय क्रमांक 7 हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दोन्ही गटात 10 बक्षिसे देण्यात येणारं आहेत.

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मा श्री विनायक राऊत शिवसेना नेते (माजी खासदार), मा श्री सुधीर भाऊ साळवी (शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य), मा श्री दत्ताजी कदम (जिल्हाप्रमुख), मा श्री रवींद्र जी डोळस (उपजिल्हाप्रमुख), मा श्री सुरेश करंबे करंबले (तालुकाप्रमुख), मा सौ उल्का विश्वासराव (महिला उपजिल्हा संघटिका), मा श्री युवराज हांडे (उपतालुकाप्रमुख), मा श्री किशोर जी अहिरे (सामाजिक कार्यकर्ते), मा श्री विजय एकनाथ अहिरे (आयोजक), विनोद हांडे (उपविभाग संघटक), श्री पांडुरंग पेडणेकर (उपसरपंच ग्रामपंचायत रिंगणे), श्री विनय वि अहिरे , (अध्यक्ष स्पर्धा कमिटी), श्री अनिल गीतये (शाखाप्रमुख प्रभाग क्रमांक 1), श्री सुरेंद्र आयरे (शाखाप्रमुख प्रभाग क्रमांक 2), श्री प्रशांत पांचाल (शाखाप्रमुख प्रभाग क्रमांक 3) सर्व महिला शाखाप्रमुख पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ स्थल रिंगणे कोंडगाव तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी उपस्थित राहणार आहे.

Total Visitor Counter

2455990
Share This Article