GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्ह्यात भातलावणीची ९४ टक्के कामे पूर्ण

Gramin Varta
6 Views

रत्नागिरी: जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, धरणे तुडुंब भरली आहेत. पावसामुळे शेतकर्‍यांना भातलावणीसाठी दिलासा मिळाला असून जिल्ह्यात आतापर्यंत ९४ टक्के भातलावणी झाली आहे.

आतापर्यंत १८ हजार २७५.५८ मिमी, सरासरी २०३०.६२ मिमी. असे ६०.३६ टक्के इतका पाऊस झाला आहे, तर रविवारी सरासरी ४९.६८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात पडला. मान्सूनमध्ये पाऊस जोरदार बरसला. नदी, धरणे भरलेली आहेत, तर मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली तर दरडी कोसळल्या, रस्ते खचल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. आतापर्यंत साडेतीन कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात दिवसरात्र पाऊस पडत आहे.जून ते २७ जुलैपर्यंत ६०.३६ टक्के सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच जुलैअखेर सरासरी २८२१.४३ मिमी. पावसाची नोंद झाली असून ८३.९७ टक्के इतका पाऊस पडला होता.

Total Visitor Counter

2645854
Share This Article