GRAMIN SEARCH BANNER

अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत भारताने नाकारली

गुजरात: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विमान अपघाताच्या चौकशीत मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या तपासकर्त्याचा समावेश करण्याची संयुक्त राष्ट्रांची मागणी भारताने फेटाळून लावली आहे.

अहमदाबादमध्ये १२ जून रोजी झालेल्या बोईंग 787-8 ड्रीमलायनर अपघातानंतर, यामध्ये २६० जणांचा मृत्यू झाला होता, संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने त्यांच्या एका तपासकर्त्याला चौकशीत मदत करण्यासाठी भारताला प्रस्ताव दिला होता. मात्र, भारताने ही मदत मान्य केली नाही. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (आयसीएओ) २०१४ मध्ये मलेशियन विमान बेपत्ता झाल्याच्या चौकशी आणि नंतर २०२० मध्ये युक्रेनियन जेटलाइनरच्या चौकशीसारख्या काही तपासात मदत करण्यासाठी तपासकर्त्यांना तैनात केले होते.

अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला होता, ज्याची तपासणी सुरू होती. अखेर तपास पथकाला यात यश मिळाले आहे.

विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, यांची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर होत्या. दरम्यान आता या ब्लॅक बॉक्सच्या तपासबद्दलची नवी आणि मोठी अपडेट समोर आली आहे. २४ जून रोजी विमानाच्या समोरील ब्लॅक बॉक्समधून क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (सीपीएम) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि २५ जून रोजी त्याच्या मेमरी मॉड्यूलमध्ये यशस्वीरित्या प्रवेश करण्यात आला. तर, आता त्याचा डेटा एएआयबी लॅबमध्ये डाउनलोड करण्यात आला आहे. लवकरच या अपघाताचे नेमके कारण समोर येणार आहे.अपघातानंतर सुमारे ३० दिवसांनी प्राथमिक अहवाल प्राप्त होतो.

Total Visitor Counter

2474938
Share This Article