रायगड : किल्ले रायगड येथे दर्शन घेऊन पुणे येथे निघालेल्या खाजगी बस ( एम एच १४ के ए ७२४५) या गाडीला महाड तालुक्यातील (जि. रायगड) घरोशी वाडी येथे दुपारी चारच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये बसमधील ११ जण जखमी झाल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
अपघाताचे वृत्त समजतात महाड तालुका पोलीस स्टेशन व पाचाड पोस्ट पोलीस स्टेशनच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी रवाना झाले, बसमधील सर्व जखमींना तातडीने रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड प्राथमिक केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शैलेश मालदे यांनी यासंदर्भात प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती दिली.
किल्ले किल्ले रायगड येथे आज सकाळी पुणे येथून सुमारे ३२ प्रवासी या गाडीतून प्रवास करीत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास किल्ले रायगड येथून निघाल्यावर चारच्या दरम्यान घरोशी वाडी येथे सदरचा अपघात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाचाड आरोग्य केंद्राच्या सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.या अपघातात अनिकेत आघाड ,किरण पाटील ,आशिष अंभोरे ,तुकाराम चोपडे ,भीमा कांबळे , तुळशीराम ,शिवाजी जाधव ,जानव्ही पारकर ,माधुरी ठोबल, तेजस पाटील, दिव्या आदी चा समावेश आहे