रत्नागिरी : शहराजवळील राजिवडा येथील श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे नामसप्ताह सोमवार दि. २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.१५ वा. पासून सोमवार दि. ०४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.३० वा. पर्यंत साजरा होणार आहे. त्यानंतर दिंडी सोहळा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये मांडवी येथील श्री भैरी देव आणि श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर महादेव पालखी भेट सोहळा दिंडीच्या तिसऱ्या फेरीला होणार आहे. दि. ११ ऑगस्ट व दि. १८ ऑगस्ट या तिसऱ्या आणि चौथ्या सोमवारी मंदिरात भजन कार्यक्रम सुरू राहणार आहे.
शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी गोपाळकाला या दिवशी मंदिरात श्री सांब देवाची पालखी सायंकाळी ६.०० वाजता श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर महादेवाच्या भेटीला येणार आहे. दि. १८ ऑगस्ट रोजी चौथ्या सोमवारी श्री लक्ष्मीसहित श्री सत्यनारायण महापूजा आयोजित आहे. सर्व कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वयंभू काशी विश्वेश्वर देवस्थान समिती राजिवडा-रत्नागिरी यांनी केले आहे.