रत्नागिरी: येथील भारत शिक्षण मंडळ संचालित पू. सौ.गोदवरीदेवी भ. बियाणी बालमंदिर आणि भिडे आजी खेळघरात पालकांसाठी खास प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.
पालकांशी सुसंवाद साधत उत्तम मार्गदर्शन केले. बालकाचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य उत्तम असेल तर ते मूल बाळ खऱ्या अर्थाने सुदृढ असते. बालकांची काळजी घेताना काय करावे आणि काय करू नये, हेअनेक उदाहरणे देऊन त्यांनी समजावून सांगितले. बालकांच्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हाती असते, हे पटवून दिले. पालकांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. स्वतःमध्ये काही योग्य ते बदल स्वीकारावेत. म्हणजे बालकांवर त्याचा चांगलाच परिणाम दिसून येईल, असेही डॉ. करे म्हणाल्या.
कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सुशोभनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन फिजिओथेरपिस्ट रोटरी क्लबचे सदस्य डॉ. संदीप करे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. धनश्री मुसळे यांनी केले. प्रबंधक विनायक हातखंबकर यांनी शाळेने आयोजित केलेल्या या पालक प्रबोधनाबद्दल समाधान व्यक्त केले. एक उत्तम व्याख्यान पालकांना ऐकण्याची संधी दिल्याबद्दल कौतुक केले. पालक प्रबोधन यशस्वी होण्यासाठी शालेय समिती राजेंद्र कदम यांचे सहकार्य लाभले. पालकप्रतिनिधी, पालक बंधूभगिनी म़ोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी : बियाणी बालमंदिर आणि खेळघरात पालकांचे प्रबोधन
