GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे विद्यालयात वंदे मातरम गीताचे गायन व भित्तिपत्रकाचे उद्घाटन

Gramin Varta
40 Views

सावर्डे : सह्याद्री शिक्षण संस्थेचे गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे येथे शासन निर्णयानुसार दिनांक 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत वंदे मातरम गीताचे गायन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदे मातरम गीताच्या निर्मितीला 150 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून विद्यालयात या गीताचा इतिहास व संपूर्ण गीत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना परिचित व्हावा म्हणून विद्यालयाच्या दर्शनी भागात माहितीपूर्ण भित्तिपत्रक लावण्यात आले.

या भित्तिपत्रकाचे उद्घाटन विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागातील मराठी विषय विभागप्रमुख महेश गंगावणे  यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या आठवड्यात संपूर्ण वंदे मातरम गीताच्या गायनाचा सरावही करण्यात आला. क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे यांनी गीताचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला, तर क्रीडा शिक्षक रोहित गमरे यांनी विद्यार्थ्यांकडून वाद्यवृंदासह संपूर्ण गीताचे सादरीकरण करून घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र वारे,उपमुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना वंदे मातरम गीताचे ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

Total Visitor Counter

3072836
Share This Article