GRAMIN SEARCH BANNER

नरबे- लाजुळ येथील आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पलता रघुनाथ सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन

जाकादेवी/ वार्ताहर:-रत्नागिरी तालुक्यातील नरबे- लाजूळ येथील बुद्ध, फुले शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ.पुष्पलता रघुनाथ सावंत यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी शनिवार दि. २८ जून रोजी रात्री ९०:३० वा हदयविकाराच्या तीव्र  झटक्याने दु: खद निधन झाले आहे.

कालकथित  पुष्पलता रघुनाथ सावंत या अत्यंत प्रेमळ, कष्टाळू आणि परोपकारी व्यक्तिमत्व होते. लाजूळ- नरबे गावचे बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेचे अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,  आयु.रघुनाथ कमलाकर सावंत यांच्या त्या पत्नी होत. मिलिंद प्रतिष्ठान लाजूळ या संस्थेचे विद्यमान सरचिटणीस आयु. सुदास सावंत यांच्या त्या मातोश्री होत.

दिवंगत पुष्पलता रघुनाथ सावंत या छोट्या मोठ्यांना सन्मान देत अनेकांना प्रेरणा देणारे असे त्यांचे बोलणे असे. आयुष्यात कष्ट आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर त्यांनी खूप माणसं जोडली. नातेसंबंध अविरतपणे जपले. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांनी स्वावलंबी बनविले.आपल्या पतींना कौटुंबिक सामाजिक धार्मिक कामात त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले.

बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेवर त्यांची मोठी श्रद्धा होती.त्यांच्या पश्चात पती,मुलगे,सूना,मुली,जावई,पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार  दि.६ जुलै रोजी नरबे लाजूळ येथे होणार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेत शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नातेवाईक , मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. दिवंगत पुष्पलता सावंत यांच्या निधनाबद्दल स्थानिक व मुंबई कमिटी व नरबे लाजूळ पंचक्रोशीतून दुःख व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2475430
Share This Article