GRAMIN SEARCH BANNER

नवीन वर्षातील पहिला सुपरमून ३ जानेवारी रोजी दिसणार

Gramin Varta
154 Views

मुंबई: जेव्हा पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सर्वात कमी असते, तेव्हा सुपरमून होतो. यामुळे चंद्र मोठा आणि उजळ दिसतो. ३ जानेवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून दिसणार आहे.

या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहील. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल.

सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार किमी असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार किमीच्या आत असते, त्याला सुपरमून असे म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तीव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हज़ार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जानेवारी रोजी सायंकाळी दिसणारा सुपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. नवीन वर्षातील ही पहिली संधी आहे. हा सुपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.

Total Visitor Counter

3199542
Share This Article