GRAMIN SEARCH BANNER

कोकणच्या सुपुत्राची ‘आयआयएम’ मुंबईत मोठी झेप; गौरव सावर्डेकरचा विशेष सन्मान

Gramin Varta
213 Views

चिपळूण (प्रतिनिधी):- बदलत्या काळात केवळ पदवी पुरेशी नाही, तर तंत्रज्ञानाची जोड असणे आवश्यक आहे, हे कोकणच्या एका गुणवंत विद्यार्थ्याने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. नॅशनल कन्नड एज्युकेशन सोसायटीच्या सर एम. विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (SVIMS) येथे शिक्षण घेणाऱ्या गौरव संतोष सावर्डेकर याने ‘आयआयएम’ (IIM) मुंबई येथे आयोजित ‘एआय इन मॅनेजमेंट’ प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करत विशेष पुरस्कार पटकावला आहे. गौरवच्या या यशामुळे संपूर्ण कोकण विभागाचे नाव अभिमानाने उंचावले असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मूळचा खेड तालुक्यातील काडवली येथील असलेला गौरव हा चिपळूणमधील ज्येष्ठ पत्रकार संतोष सावर्डेकर यांचा सुपुत्र आहे.

त्याचे प्राथमिक शिक्षण चिपळूणच्या परांजपे मोतीवले हायस्कूलमध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण डीबीजे महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर त्याने मांडकी-पालवण येथून कृषी अभियांत्रिकी (बी.टेक.) पदवी प्राप्त केली. सध्या तो मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एसव्हीआयएमएस बिजनेस स्कूलमध्ये पीजीडीएमचे उच्च शिक्षण घेत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध असून, विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयाने आयआयएम मुंबईसोबत विशेष प्रशिक्षण आयोजित केले होते.

या प्रशिक्षणादरम्यान गौरव सावर्डेकर याने आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने लॉजिस्टिक्स सप्लाय चेन आणि मार्केटिंग यांसारख्या विषयांवर आपले शोधनिबंध व प्रकल्प मॉडेल सादर केले. प्राध्यापक अयान ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेले हे सादरीकरण अत्यंत दर्जेदार ठरले. या यशाबद्दल आयआयएमचे प्रोफेसर पूर्णिमा सांगळे, प्रोफेसर अमित कुमार दास आणि प्रोफेसर रॉनी मित्रा यांच्या हस्ते गौरवाचा गौरव करण्यात आला.

एसव्हीआयएमएस ही संस्था विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार करत आहे. येथे विद्यार्थ्यांना डेल कार्नेगी (USA), वर्ल्ड ट्रेड सेंटर यांसारख्या पाच आंतरराष्ट्रीय संस्थांची प्रमाणपत्रे मिळतात. माफक फी आणि दर्जेदार प्लेसमेंटसाठी ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेतून विद्यार्थी मोठ्या पॅकेजवर नोकऱ्या मिळवत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षासाठी ३१ मार्च २०२६ पूर्वी प्रवेश निश्चित करणाऱ्या विद्यार्थ्यांना ब्रँडेड लॅपटॉप, कॉर्पोरेट युनिफॉर्म आणि मोफत इंडस्ट्रियल व्हिजिट अशा सुविधाही दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना संस्थेचे धर्मेंद्र जगताप यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगांमधील आव्हानांसाठी तयार करणे हाच आमचा मुख्य उद्देश आहे. कोकणच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी ९८९२५७१४६० या क्रमांकावर किंवा www.svims.com या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3250767
Share This Article