रत्नागिरी चरवेली येथून दुचाकीची चोरी

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

रत्नागिरी : तालुक्यातील चरवेली येथील दुर्गामातानगर परिसरातून दुचाकी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १७ ते १९ डिसेंबर या कालावधीत घडली असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नामदेव सिद्राम भोसले (वय ३३, रा. दुर्गामातानगर, चरवेली) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, भोसले यांनी आपली दुचाकी (क्रमांक एमएच ०८ एएस ७७६३) घराच्या अंगणात उभी करून ठेवली होती. मात्र, १७ ते १९ डिसेंबरदरम्यान अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *