GRAMIN SEARCH BANNER

पैसे न दिल्याच्या रागातून सावत्र बापावर दांडक्याने हल्ला

Gramin Varta
176 Views

रत्नागिरी : रेल्वे स्थानक परिसरात पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने आपल्या सावत्र वडिलांना दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. गंगाराम गनू घोडेकर (वय ७६, रा. नरसरीवाडी, ता. लांजा) असे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

या प्रकरणी अर्जुन भिवा पवार (वय ३८, रा. पानवल होरंबेवाडी) याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम घोडेकर हे रेल्वे स्थानक परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी अर्जुन पवार हा त्या ठिकाणी आला व त्याने सावत्र वडील गंगाराम यांच्याकडे खर्चासाठी पैसे मागितले. मात्र, गंगाराम यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या अर्जुनने लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. याबाबत गंगाराम घोडेकर यांनी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3199540
Share This Article