राजापूर : तालुक्यातील बेनगी येथील वारीकवाडी मंडळासमवेत लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी नुकतीच विकास कामांबाबत बैठक घेतली. गावातील मूलभूत सुविधांचा आढावा घेताना रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गावकऱ्यांनी मांडलेल्या विविध मागण्यांकडे आमदार सामंत यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले व संबंधित विभागांमार्फत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून, प्रत्येक योजना पोचतील.”
बेनगी वारीकरवाडीच्या विकासासाठी आमदार किरण सामंत कटिबद्ध*
राजापूर तालुक्यातील बेनगी गावातील वारीकवाडी येथे झालेल्या बैठकीत “लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या प्रसंगी वारीकवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना आमदार सामंत म्हणाले, “देणगी वारीकवाडीचा विकास हाच माझा अभ्यास असून, येत्या काळात कोणत्याही विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही. गावाच्या प्रत्येक गरजेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.”
या बैठकीला वारीकवाडीतील ग्रामस्थ, स्थानिक मंडळाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रामस्थांनी आमदारांच्या आश्वासनाचे स्वागत करत गावाच्या विकासाची गती वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.होते.आणि निधीचा उपयोग गावाच्या प्रगतीसाठी करण्यात येईल,” असे आश्वासन आमदार सामंत यांनी बैठकीदरम्यान दिले.
यावेळी या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप तालुकाप्रमुख दीपक नागले, युवा सेना तालुकाप्रमुख सुनील गुरव , रमेश वारिक प्रमोद वारीक दत्तात्रय वारिक दामोदर वारी सुभाष वारी फणसे सर संदीप वारीक दीपक वारीक विलास वारीक अनिल वारीक अजित वारीक यांच्यासहित गावातील प्रमुख मान्यवर महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीला स्थानिक ग्रामस्थ, वारीकवाडी मंडळाचे पदाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गावकऱ्यांनी आमदारांच्या पुढाकाराचे स्वागत करून अपेक्षित विकासकामे वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.