नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाद्वारे देशभरातील तरुणांना एक भेट दिली आहे.
तसेच देशालाही संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली. आजपासून देशात प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरु करत असल्याचे त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान मोदींकडून तरुणांसाठी नवी योजना जाहीर
ते म्हणाले, आज मी देशातील तरुणांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज १५ ऑगस्ट आहे. आजपासून सरकार देशातील तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची योजना सुरु करते आहे. आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना लागू होत आहे.
काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना?
पुढे बोलताना त्यांनी ही योजना नेमकी काय आहे, याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुण तरुणांना १५ हजार रुपये सरकारद्वारे दिले जाणार आहेत. याशिवाय ज्या कंपन्या जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करतील त्यांनाही प्रोत्साहन बक्षीस दिलं जाणार आहे. तसेच ही योजनेंतर्गत देशातील साडेतीन कोटी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले.
”उद्योग ही देशाची मोठी ताकद”
गेल्या वर्षात उद्योग ही देशाची मोठी ताकद बनली आहे. आज लाखो स्टार्टअप देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. मुद्रा योजनेत तरुण तरुणींनी कर्ज घेऊन उद्योग करत आहेत. दुसऱ्या रोजगार देत आहेत. असंही त्यांनी नमूद केलं.
”स्वातंत्र्याचा उत्सव १४० कोटींच्या संकल्पनेचा उत्सव”
आजचा स्वातंत्र्याचं हा उत्सव १४० कोटींच्या संकल्पनेचा उत्सव आहे. हा उत्सव भारताच्या गौरवाचा उत्सव आहे. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून भारत माता की जय हा एकच नारा निघतोय आहे. १९४७ मध्ये आपला देश स्वातंत्र्य झाला. देशाच्या अपेक्षा वाढत होत्या. मात्र, त्याबरोबरच आव्हान त्यापेक्षा जास्त होती. संविधान सभेच्या सदस्य्यांनी महत्त्वाचं कार्य पार पाडलं. भारताचं संविधान गेल्या ७५ वर्षात आपल्यााला मार्ग दाखवतो आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.