चिपळूण : तालुक्यातील एका बालिकेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली. बालिकेने आपल्या राहत्या घरातील बेडरूमध्ये छताच्या पंख्याला साडीने गळफास लावून घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. घरामध्ये अन्य खोलीत आजी, आई व बहीण होती. हा प्रकार लक्षात येताच तिची बहीण बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
चिपळुणात बालिकेची गळफास घेऊन आत्महत्या
