खेड : तालुक्यातील लवेल येथील नवनगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे ७९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
फिर्यादी अमितकुमार मनोहर सागवेकर (वय ४२, रा. अंबरनाथ) हे आपल्या कुटुंबासह लवेल येथील श्री स्वामी समर्थ, नवनगर, घरडा हॉस्पिटल समोर राहत असलेल्या घरात काही काळासाठी बाहेर गेले होते. ही संधी साधून दिनांक १५ जुलैच्या रात्री १० वाजेपासून १६ जुलै दुपारी २.५४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या कंपाउंडचा लोखंडी गेटचे लॉक तोडले.
यानंतर चोरट्यांनी घराच्या दर्शनी दरवाजावरील पितळी कडी व कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन बेडरुम, लाकडी टेबल, देवघरातील कपाटांची तोडफोड करून त्यांनी चांदीचे दागिने, सोन्याच्या शिकल्या अशा एकूण ७९,३९५ रुपयांचा ऐवज लंपास केला.
ही घटना फिर्यादीस १७ जुलै रोजी लक्षात आली असून त्यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
खेडमध्ये भरदिवसा घरफोडी; चोरट्यांचा सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला
