रत्नागिरी: रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये नुकत्याच पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत आदर्श हायस्कूल, कुरतडेच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मुलामुलींनी विविध वजनी गटांमध्ये पदके पटकावून शाळेची मान उंचावली आहे.
या स्पर्धेत ४१ किलो वजनी गटात रुद्र विजय फुटक याने प्रथम क्रमांक पटकावला. ३५ किलो वजनी गटात सक्षम संदीप भोवड याने द्वितीय क्रमांक मिळवला. ५१ किलो वजनी गटात आयुष पांडुरंग करसोडे याने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. ५५ किलो वजनी गटात अर्णव विश्वास फुटक याने प्रथम तर सार्थक गंगाराम फुटक याने द्वितीय क्रमांक मिळवून शाळेला दुहेरी यश मिळवून दिले.८० किलो वजनी गटात शुभम संतोष आखाडे याने द्वितीय क्रमांकाचे स्थान मिळवले. ४८ किलो वजनी गटात श्रेयश निलेश आग्रे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर आकाश अरुण जोगळे याने द्वितीय क्रमांक मिळवला. तर ४५ किलो वजनी गटात मुलींच्या गटात नंदिनी महेश पालवकर हिने द्वितीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
आदर्श हायस्कूलच्या या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल बोलताना, शाळेचे शिक्षक मानसिंग कदम यांनी सांगितले की, “या विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाले आहे. भविष्यातही हे विद्यार्थी कुस्तीच्या क्षेत्रात मोठे यश मिळवतील, असा विश्वास आहे.” या कामगिरीमुळे रत्नागिरीतील क्रीडा वर्तुळात आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक होत आहे.
रत्नागिरी: आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
