GRAMIN SEARCH BANNER

ॲड. अमोल शिंदे ठरले रत्नागिरीचे पहिले कराओके आयडॉल २०२५

Gramin Search
33 Views

गुंजन इव्हेंट्सच्या धूमधडाक्यातील स्पर्धेला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी: गुंजन इव्हेंट्स तर्फे आयोजित रत्नागिरीचा कराओके आयडॉल २०२५ सीझन १ या नाविन्यपूर्ण स्पर्धेत अॅड. अमोल शिंदे यांनी प्रेक्षक आणि परिक्षकांची मने जिंकत पहिला कराओके आयडॉलचा मान पटकावला. वीर सावरकर नाट्यगृहात रंगलेल्या या थरारक अंतिम फेरीत त्यांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. सौ. प्राजक्ता कुलकर्णी यांनी द्वीतीय, तर श्री. रवींद्र जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. इतर ८ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. दोन महिन्यांच्या व्यापक ऑडिशन्समधून ५५० हून अधिक स्पर्धकांमधून ५२ जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. रत्नागिरीकरांनी या अनोख्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद देत नाट्यगृह हाऊसफुल्ल केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक श्री. अण्णा सामंत यांच्या हस्ते झाले.

यावेळी गुंजन इव्हेंट्सतर्फे श्री. कांचन मालगुंडकर, श्री. अमेय वीरकर, श्री. गौरांग आगाशे, श्री. सिराज साखरकर, श्री. शरफुद्दीन साखरकर, श्री. नासिर होडेकर, श्री. अजीम होडेकर आणि श्री. अहमद होडेकर यांना युवा उद्योजक, तर श्री. केदार उर्फ मुन्ना देसाई यांना युथ आयकॉन म्हणून गौरवण्यात आले. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले आमदार, पालकमंत्री आणि उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत यांनी गुंजन इव्हेंट्सच्या या धाडसी कल्पनेचे कौतुक केले. त्यांनी भविष्यात महाराष्ट्राचा कराओके आयडॉल स्पर्धा आयोजित करण्याची विनंती करत पूर्ण पाठिंबा जाहिर केला. त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी मैत्री ग्रुपचे श्री. कौस्तुभ सावंत, पद्मावती कन्स्ट्रक्शनचे श्री. विकी शेठ जैन, श्री. अमोल डोंगरे, परिक्षक श्री. सतीश राठोड, श्री. मतीन कापडी, तसेच गुंजन इव्हेंट्सचे मुख्य आयोजक अॅड. अमित नागवेकर, अॅड. सरताज कापडी तसेच गुंजन ग्रुप चे श्री. राज चव्हाण, श्री. निखिल भुते, अभिलाष पिळणकर आणि श्री. दिपक डांगे उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात नवा अध्याय रचणारी ही स्पर्धा यापुढेही नव्या प्रतिभांना संधी देण्यासाठी प्रेरणा ठरेल, असा विश्वास स्पर्धेचे मुख्य आयोजक अॅड. अमित नागवेकर व अॅड. सरताज कापडी यांनी व्यक्त केला तसेच आयोजक गुंजन इव्हेंट्स यांनी हौशी गायकांसाठी चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला असे मत अॅड. अमोल शिंदे यांनी व्यक्त केले.

Total Visitor Counter

3108199
Share This Article