रत्नागिरी–करबुडे मार्गे उक्षी रस्त्यावरील शीळ येथे सोमवारी रात्री चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक उलटून अपघात झाला. या दुर्घटनेमुळे काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. मंगळवारी सकाळी क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला काढण्यात आला.
मुंबई–गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनधारक पर्यायी म्हणून या मार्गाचा वापर करत आहेत. प्रशासनाने अवजड वाहनांसाठी या रस्त्याचा वापर टाळावा, अशा सूचना वारंवार दिल्या असूनही मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.