रत्नागिरी: राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आज सडा मिर्या बंदर येथील जेटीची प्रत्यक्ष पाहणी करून या भागातील मच्छीमारांना दिलासा दिला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल घेत ना. सामंत यांनी स्वतः स्थळभेट देऊन येथील परिस्थितीची माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान, नामदार उदय सामंत यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. ग्रामस्थांच्या मागणीनुसार आवश्यक असलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी तातडीने इन्स्टीमेंट तयार करून सादर करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
स्थानिकांची मागणी पूर्ण करून या भागातील विकासकामांना वेग दिला जाईल. तसेच, सडा मिर्या बंदर परिसरातील मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्याचा आणि मच्छीमारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी ते कटिबद्ध असल्याचे या पाहणीतून दिसून आले आहे.





