GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

Gramin Varta
908 Views

मुंबई : मुंबई–गोवा महामार्गावर आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मागून कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात कोलाडजवळील पुई गावाच्या हद्दीत घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने कोलाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारमध्ये एक व्यक्ती अडकली होती. त्याला हायड्रॉलिक कटरच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले.

अपघातग्रस्त वाहन हे हुंडई कंपनीचे ‘ऑरा’ मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3206087
Share This Article