GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी साळवी स्टॉप येथे विजेचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील साळवीस्टॉप येथील जलतरण तलावाजवळ विजेचा धक्का लागून एका दुभत्या म्हैशीचा मृत्यू झाला. महावितरणच्या अंडरग्राऊंड केबलचा फटका एका मुक्या जनावराला बसला. या घटनेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण आहे. येथील रस्त्यालगतच्या वीज खांबाजवळ हा शॉक येत होता असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

साळवीस्टॉप जलतरण तलावाजवळील अरिहंत बिल्डींगजवळील वीज खांबाजवळ हा प्रकार घडला. रस्त्यालगत असणार्‍या पथदीपाच्या खांबाला हा शॉक येत होता. रात्रीच्यावेळी हा शॉक लागला असावा सकाळी नागरिकांना ही म्हैस मरण पावलेली आढळली. याबाबत नगर पालिकेला नागरिकांनी कळवले होते. त्यानंतर नगर पालिकेच्या कर्मचार्‍यांनी ही म्हैस उचलून नेली.

अंडरग्राऊंड केबलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. एखादा माणूस त्या ठिकाणाहून जाताना शॉक लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

Total Visitor Counter

2475385
Share This Article