GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : सावर्डे येथे खासगी आराम बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

Gramin Varta
7 Views

संदीप घाग, सावर्डे : सावर्डे येथे मुंबई–गोवा महामार्गावर आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एका खाजगी आराम बसचा अपघात झाला. अतिवेगामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूस जाऊन थेट एस.टी. निवारा शेडवर धडकली. या अपघातात निवारा शेड कोसळले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली.

बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना हा अपघात घडला. नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या उलट्या बाजूला तब्बल ५० फूट अंतरावर जाऊन धडकली. अपघात दिवसा झाला असता तर गजबजलेल्या बाजारपेठेत मोठी जीवितहानी झाली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नुकतेच याच ठिकाणी थार कारचाही अपघात झाला होता. त्यामुळे केवळ आठवड्यातच दुसऱ्यांदा या ठिकाणी अपघात झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही अपघातांचे कारण वाहनांचा अतिवेग आणि वाहतूक नियमांकडे झालेले दुर्लक्ष हेच असल्याचे स्पष्ट होत आहे.

आता या दुर्घटनेत कोसळलेल्या एस.टी. निवारा शेडचे बांधकाम महामार्ग विभाग करणार की खाजगी बस मालक, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणी पोलिस प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडेही स्थानिकांचे लक्ष आहे

Total Visitor Counter

2645851
Share This Article