GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : गणपती सणासाठी गावी आलेल्या कुटुंबाचे सोन्याचे दागिने लंपास

Gramin Varta
17 Views

चिपळूण: गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले सुमारे ३ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना ४ सप्टेंबरच्या रात्री ११ ते ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान चिपळूण तालुक्यातील मांडकी गावातील घाणेकरवाडी येथे घडली.
या प्रकरणी, सुशील तानाजी घाणेकर (वय ३१, मूळचे घाटकोपर, मुंबई ) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घाणेकर हे गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबासह गावी आले होते. त्यांनी सोबत आणलेले १५ तोळे ५ ग्रॅम ४०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने एका बॉक्समध्ये भरून लोखंडी कपाटात काळ्या पिशवीत ठेवले होते.

घाणेकर आणि त्यांचे कुटुंब घरात असतानाच, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून आत प्रवेश केला. त्यानंतर, त्याने थेट कपाटातील पिशवीत ठेवलेले सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर घाणेकर कुटुंबीयांना धक्का बसला. तातडीने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली.

चिपळूण पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

2648025
Share This Article