GRAMIN SEARCH BANNER

गणेशोत्सवात पालखी, पर्यावरण व मराठी भाषा संवर्धनाचा संदेश

Gramin Varta
35 Views

लांजा : तालुक्यातील, शेळवीवाडी (हर्चे) येथील हर्षद तोडणकर (तोडणकर परिवार) हे दरवर्षी गणेशोत्सवात नाविन्यपूर्ण देखावे सादर करण्यासाठी ओळखले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात त्यांनी घरगुती सजावटीत कोकणातील पालखीचा देखावा उभारून गणरायाचे दर्शन घडवले आहे.

याचबरोबर “एक पेड मा के नाम” या गणेशजींच्या संदेशातून माणसाने किमान एक तरी झाड लावावे, असा पर्यावरणपूरक संदेश प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला आहे. तसेच मराठी भाषा गौरव व संवर्धनाचा संदेश देणारा माहितीपर देखावाही सजावटीचा भाग आहे.

सदर सजावटीसाठी हर्षद तोडणकर यांनी पुठ्ठा, कागद यांसारख्या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून समाजजागृतीचा हेतू साधला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3369942
Share This Article