अॅड. अमित शिरगावकर यांनी मांडली प्रभावीपणे बाजू
रत्नागिरी: तळवली (ता. गुहागर) येथील सरपंच मयुरी शिगवण यांना अपात्र ठरवण्याचा तहसीलदार गुहागर यांचा निर्णय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी रद्द केला आहे. त्यामुळे मयुरी शिगवण यांना पुन्हा सरपंच पदासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
तहसीलदार गुहागर यांनी दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी शिगवण यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता. याविरोधात मयुरी शिगवण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. सदर अपीलचा निकाल सरपंच शिगवण यांच्या बाजूने लागला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांचा आदेश रद्द करून त्यांना पात्र ठरवले आहे.
या प्रकरणात मयुरी शिगवण यांची बाजू वकिल अॅड. अमित अनंत शिरगावकर यांनी प्रभावीपणे मांडली.
या निर्णयामुळे गावात समाधान व्यक्त होत असून, सरपंच मयुरी शिगवण यांना पुन्हा कामकाज सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गुहागर तळवली सरपंच अपात्रतेचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द, मयुरी शिगवण पुन्हा पात्र

Leave a Comment