तुषार पाचलकर / राजापूर : ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्ग हा राजापूरातील महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून प्रवाशांचे अक्षरशः हाल होत आहेत. सणासुदीच्या दिवसांत गावाकडे आलेल्या चाकरमान्यांना या खड्डेमय रस्त्यांचा त्रास अधिक सहन करावा लागला. रस्त्यावरच्या खड्यांमुळे प्रवासात होणारा विलंब, अपघातांचा धोका आणि दैनंदिन हालअपेष्टा यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. यामुळे हैराण झालेल्या जनतेने आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत माजी आमदार राजन साळवी यांनी महत्वाची भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे संपर्क साधून रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला.
रस्त्याच्या दुरुस्ती साठी आणि नूतनीकरना संदर्भात परिसरातील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्रव्यवहार करून 17 सप्टेंबर रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्यानंतर विभागाने लवकरच कामाला सुरवात करू असं लेखी आश्वासन देऊन पुन्हा एकदा मलमपट्टीचे काम सुरू केले होतें परंतू ऐन पावसात सुरवात झालेल्या या कामाला पुन्हा पावसामुळे सा. विभागाने स्थगिती दिली.या पार्श्वभूमीवर
आज 16 रोजी सार्वजनिक बांधकामं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रालयातील कार्यालयात मा. आमदार राजन साळवी सह ग्रामस्थांनी भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कायमची उपाययोजना करण्या संदर्भात निवेदन दिले याची तात्काळ दखल घेत विभागाच्या अभियंताना सूचना केल्या व पावसाळा संपल्यानंतर लवकरच रस्त्याच्या कामाला सुरवात करू व आता थोडाफार पाऊस थांबला की रस्त्याच्या दुरुस्ती साठी बांधकाम विभागाला कळवू असं आश्वासन दिल्याने उद्याच्या रस्त्यासंदर्भात आंदोलनाला ग्रामस्थांनी तूर्तास स्थगिती दिली आहे.
तीन वर्षांपूर्वी राजन साळवी यांनी रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते आज पुन्हा एकदा राजन साळवी यांच्या मध्यस्तीने रस्त्यासाठी दुरुस्तीसाठी व नूतनि करणासाठी प्रयत्न होताना दिसतं आहे..
ओणी-पाचल-अनुस्कुरा मार्गावरील खड्ड्याबाबत उद्याचे आंदोलन स्थगिती, मंत्रालयातून रस्त्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी आश्वासन
