GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत 33 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
538 Views

रत्नागिरी : शहराजवळील लेपसी कॉलनी परिसरात मंगळवारी पहाटे एका तरुणाचा गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला. आशिष रोहित माने (वय 33, रा. लेपसी कॉलनी, उद्यमनगर) अशी मृताची ओळख पटली आहे.

घरातील खोलीतच ओढणीच्या साहाय्याने आशिषने जीवनयात्रा संपविल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होते. सकाळी घरच्यांच्या लक्षात येताच घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. शहर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन पंचनामा केला.

आशिषने आत्महत्येचा निर्णय कोणत्या कारणाने घेतला याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास सुरू असून पोलिस कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Total Visitor Counter

3366895
Share This Article