संगमेश्वर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ च्या प्राथमिक पहाणी करणे व मार्गदर्शन यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हापरिषद रत्नागिरी)वैदेही रानडे यांनी ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक ला भेट दिली. या दरम्यान त्यांनी अभियान साठी असणाऱ्या सर्व मुद्देसूद अडावा घेतला आणि योग्य मार्गदर्शन केले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ -२६ साठी ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बुद्रुक ने सहभाग नोंदवला आहे.गटविकास अधिकारी आनंद लोकरे व सहायक गटविकासाधिकारी विनोदकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुहास माईंगडे, उपसरपंच शोएब भाटकर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामपंचायत अधिकारी सौ संजीवनी गवंडी व सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या वतीने या अभियानातील सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजनबद्द प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आंबेड बुद्रुक येथे भेट देऊन या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतिने केलेल्या कामाची पाहणी केली. सर्व प्रथम जलसमृद्ध स्वच्छता व हरित गाव संकल्पने अंतर्गत लोकसहभागातून मानस्कोंड येथे वनरायी बंधारा बांधताना भेट दिली व उपस्थित महिला व ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालय येथे मार्गदर्शन सभा संपन्न झाली. या सभेचं सूत्रसंचलन करताना कानरकोंड शाळेचे शिक्षक पाचकाले गुरुजी यांनी सुरुवातीला ग्रामपंचायतच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्या नंतर CO मॅडम यांनी विविध प्रशासकीय बाबींचा आढावा घेतला व मार्गदर्शन केले. सभेच्या शेवटी उपसरपंच शोएब भाटकर यांनी सर्वांचे आभार मानले. या नंतर ग्रामपंचायत च्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून CO मॅडम च्या हस्ते 10 शेतकऱ्यांना गांडूळ खात प्रकल्प चे साहित्य वाटप केले.
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी सागर पाटील,सामान्य प्रशासन मुख्यकार्यकारी अधिकारी विजयसिंग जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे,महिला बालविकास प्रकल्प अधिकारी मल्लिनाथ कांबळे ,विस्तार अधिकारी एस पी घुले,जे आर पारसे,,पंकज निकम, कृषी अधिकारी परेश सुर्वे, कृषी विस्तार अधिकारी प्रणय भायनाक, पाणीपुरवठा उपभियंता अभि कांबळे, बांधकाम उपअभियंता शिरिषकुमार गायकवाड , सरपंच सुहास माईंगडे, उपसरपंच शोएब भाटकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिरुद्ध मोहिते, पोलीस पाटील, केंद्र प्रमुख, शिक्षक, अंगणवाडी सेविका, CRP, बचतगट प्रतिनिधी ,आरोग्य अधिकारी ,अशासेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.






