मुंबई: गणेशोत्सव अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपलेला असताना पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्ती निर्मितीवरून निर्माण झालेली अनिश्चितता अनेक मूर्तिकारांसाठी अडचणीची ठरली आहे.
पीओपी मूर्तीवरील बंदी उशिरा उठवली गेली आहे. यामुळे यंदा अमरावती च्या बाजारात मूर्तीची टंचाई आणि २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यंदाचा गणेशोत्सव आर्थिक सापडलेल्या संकटात मूर्तिकारांसाठी अधिकच कठीण ठरू शकतो. शिवाय गणेशोत्सव यंदाचा भाविकांसाठी देखील आर्थिक टंचाईचा जाणवणार आहे. कारागिरांना मूर्ती विक्रीच्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. पीओपीवरील बंदीवर वेळेत निर्णय न झाल्यामुळे मूर्तिकार आणि ग्राहक दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरवाढ आणि टंचाई टाळायची असल्यास नागरिकांनी वेळेत बुकिंग करणे आवश्यक आहे.
वेळेअभावी जिल्ह्यात गणेशमूर्ती निर्मितीदेखील कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे भाविकांना मूर्तीसाठी दुसऱ्या गावी जावे लागण्याची शक्यता आहे.पीओपी’वरील बंदी उठविण्यात आल्याने पुन्हा एकदा शाडूच्या मूर्तीचे भाविकांमध्ये आकर्षण वाढल्याचे दिसून येत आहे.
दरात २५ टक्क्यांनी वाढ
तयार मूर्तीची संख्या कमी असल्याने यंदा श्रीगणेशाच्या मूर्तीच्या किमतीमध्ये २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
कच्च्या मालाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा मूर्ती कारागीरदेखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने पीओपी मूर्तींच्या दरात वाढ
