नंदकुमार शेट्ये यांचे पोलिसांना आवाहन; मंदिरात CCTV बसवण्याची घोषणा
तुषार पाचलकर / राजापूर : करक येथील लक्ष्मी मंदिरात आज झालेल्या घंटा चोरीच्या घटनेनंतर ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली असून, या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. गावातील व्यावसायिक व ग्रामस्थ नंदकुमार शेट्ये यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस प्रशासनाला आवाहन केले आहे की, चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा.
चोरट्यांना पकडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला किंवा पथकाला ११,१११ (अकरा हजार एकशे अकरा) रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
तसेच परिसरातील करक मंदिरांत CCTV कॅमेरे बसवण्याच्या पोलिसांच्या सूचनेचे स्वागत करत, करक येथील लक्ष्मी मंदिरात येत्या आठ दिवसांत स्वतःच्या खर्चाने CCTV कॅमेरे बसवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
या उपक्रमामुळे मंदिर सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून, ग्रामस्थांकडून नंदकुमार शेट्ये यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
राजापूर : लक्ष्मी मंदिरातील घंटा चोरीस गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप, चोरट्यांना पकडल्यास ११,१११ रुपयांचे बक्षीस!
