बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गौरवोद्गार, राजापुरात तालुका मर्यादित स्पर्धा उत्साहात संपन्न
राजापूर : राजापूर रॉयल चेस अकॅडमी तर्फे आयोजित तालुका मर्यादित बुद्धिबळ स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या सोहळ्याचे उद्घाटनाच ऍड. जमीर खलिफे व माजी नगरसेविका सुजाता बॉटले यांच्या हस्ते पार पडले. बुद्धिबळाच्या पटावर चाल करून त्यांनी उद्घाटन केले. यावेळी सौ. चव्हाण, सौ. लिंगायत व नवनाथ बिर्जे उपस्थित होते.
उद्घाटनानंतर ऍड. खलिफे यांनी मुलांना “आयुष्यात बुद्धिबळ कसे खेळायचे” याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी अमृत तांबडे यांच्यासोबत एक मैत्रीपूर्ण डाव खेळत तो बरोबरीत सोडवला. “राजापूर तालुक्यातील मुलांनी मेहनत घेतली, तर आम्ही कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू. हा खेळ जागतिक पातळीवर गाजवण्यासाठी तयारी करा,” असे त्यांनी सांगितले. तसेच 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जिल्हा निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आणि निवड झालेल्या मुलांचा सत्कार करण्याची ग्वाही दिली.
श्री नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन खलिफे यांचा सत्कार केला. अतुल हलीकर यांनी स्पर्धकांसाठी नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली. बक्षिसे, ट्रॉफी व मेडल्स यांचे प्रायोजनही खलिफे यांनीच केले. कार्यक्रमाच्या शेवटी मोहसीन यांनी खलिफे व बॉटले यांचे आभार मानून स्पर्धेची सांगता केली.
बुद्धिबळाचा खेळ जागतिक पातळीवर गाजवण्यासाठी मुलांनी तयारी करा, आम्ही तुमच्या पाठीशी : ऍड जमीर खलिफे
