पुणे: लक्ष्मी रस्त्यासह सर्व मार्गांवरील विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करावी,’ अशी मागणी पुणे शहर गणेशोत्सव समितीच्या माध्यमातून विविध गणेश मंडळांनी केली.
याबाबत मानाच्या गणपती मंडळांशी संवाद साधण्यात येणार आहे. मुख्य मिरवणूक नेहमीच्या वेळेनुसार सुरू होणार असेल, तर लक्ष्मी रस्त्यावरून अन्य मंडळांना मिरवणूक सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला.
पुणे शहर गणेशोत्सव समितीतर्फे आयोजित बैठकीस निमंत्रक संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, निंबाळकर तालीम मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, भरत मित्र मंडळाचे बाळासाहेब दाभेकर, गरुड गणपती मंडळाचे सुनील कुंजीर, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, उदय महाले, नरेंद्र व्यवहारे, मनीष साळुंके, अजय दराडे, विनायक धारणे यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बालगुडे यांनी प्रास्ताविकामध्ये बैठकीची भूमिका मांडली.
विसर्जन मिरवणूक सकाळी साडेसातला सुरू करा – गणेशोत्सव समिती
