रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप धार येथे झालेल्या अपघातात दोषी ठरलेल्या ट्रकचालकाला न्यायालयाने 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 दिवस साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
सय्यद अन्सार पाशा (वय 50, रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. आर. पाटील यांनी हा निकाल दिला.
21 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजता सय्यद पाशा हे ट्रक (क्र. केए 16 एए 1411) घेऊन रत्नागिरी-पावस रस्त्याने जात असताना गोळप धार येथे त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाला धडकला. या अपघातात चालक पाशा जखमी झाला तर ट्रकचेही मोठे नुकसान झाले.
घटनेनंतर पूर्णगड पोलिसांनी पाशाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 281, 125(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल केला होता.
रत्नागिरी : गोळप धार येथील अपघात प्रकरणी ट्रक चालकाला दंड
