GRAMIN SEARCH BANNER

नाईक हायस्कुलची झिकरा काद्री हिचा डिप्लोमा इन फार्मसीत महाविद्यालयात प्रथम क्रमांक

रत्नागिरी : गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या ध्येयाने कार्यरत असलेल्या एम. एस. नाईक हायस्कूल, धनजी नाका या शिक्षण संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी झिकरा फातिमा अकबर काद्री हिने डिप्लोमा इन फार्मसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. झिकराने ८३.६४ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नाईक स्कूलकडून झिकराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘शांतता, शिस्त आणि कार्य’ या मूल्यांवर भर देणाऱ्या नाईक स्कूलच्या शिक्षणपद्धतीचा प्रभाव तिच्या यशातून दिसून येतो. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले असून, तिने आपल्या कुटुंबासोबतच विद्यालयाचेही नाव उज्वल केले आहे.

झिकराच्या या घवघवीत यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास विद्यालयाने व्यक्त केला आहे. तिच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस नाईक स्कूल परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Total Visitor Counter

2474928
Share This Article