तरवळ/ अमित जाधव: रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ स्थानिक व मुंबई आणि बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा व संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे.
आषाढ पौर्णिमेपासून या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेची सुरुवात होते. प्रत्येक गावात जाऊन तेथील धम्म बांधवांना धम्म म्हणजे काय याची माहिती दिली जाते. तथागत गौतम बुद्ध यांनी जो धम्म सांगितला आहे त्या धम्माची शिकवण आपल्या धम्म बांधवांना देणे हा मुख्य उद्देश या वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा असतो. या वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमात धर्माविषयी माहिती देण्यासाठी प्रसिद्ध धम्म प्रवचन कार करुणा पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सदर वर्षावास धम्म प्रवचन कार्यक्रमास सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक १७ चे विद्यमान अध्यक्ष रविकांत पवार तसेच मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.