GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Gramin Varta
94 Views

चिपळूण : चिपळूण नगर परिषद यांच्या वतीने शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी पावणेआठ वाजता नगर पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवजा महाराज यांच्या अर्धपुतळ्यास नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याधिकारी संजय जाधव, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, आरोग्य सभापती शुभम पिसे, तसेच नगरसेवक फैसल कासकर, विकी नरळकर, विकी लवेकर, निलम जाधव, उदय जुवळे, वैशाली कदम, राणी महाडिक, प्रमोद बुरटे, हर्षाली पवार, शहनाज वांगडे, कपिल शिर्के, रोहित खाडे यांच्यासह नगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर मार्कंडी येथील छत्रपती शिवजा महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.

शिवजयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीने नगर पालिका परिसरातील, तसेच अश्वारूढ पुतळा परिसरातील पुतळ्यांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ध्वनिवर्धक यंत्रावरून शिवरायांचे गुणगान करणारी गीते व पोवाडे प्रसारित करण्यात येत आहेत.

सायंकाळी सात वाजता चौपाटी येथे “गर्जा महाराष्ट्र माझा” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3256864
Share This Article