फणस किंग मिथिलेश देसाई ‘आउटस्टँडिंग प्रोफेशनल अवॉर्ड २०२६’ने सन्मानित

Gramin Varta
478 Views

नवी दिल्ली: फणस शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगामध्ये भरीव योगदान देणाऱ्या मिथिलेश देसाई यांना नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘एग्रीकल्चर टुडे ग्रुप’च्या ‘आउटस्टँडिंग प्रोफेशनल अवॉर्ड २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या सकाळी झालेल्या सत्रात मिथिलेश देसाई यांनी पॅनलिस्ट म्हणून सहभाग नोंदवत फणस शेती आणि प्रोसेसिंगमधील आपल्या कार्याबद्दल आणि अनुभवांबद्दल सविस्तर मते मांडली.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ दीपक पारेख यांनी या सत्राचे मॉडरेटर म्हणून काम पाहिले, तर या पॅनलमध्ये पद्मश्री पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकरी आणि हरयाणातील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश होता. देशपातळीवर मिळालेला हा आपला पहिलाच मोठा पुरस्कार असल्याचे नमूद करत, मिथिलेश देसाई यांनी हे यश फणस पिकाला समर्पित केले आहे. तसेच, या यशाबद्दल त्यांनी एग्रीकल्चर टुडे ग्रुपचे एम.जे. खान आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हारिस खान यांचे आभार मानले आहेत.

Total Visitors :
4826823
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *