GRAMIN SEARCH BANNER

सुतारकाम करताना पडल्याने जखमी झालेल्या तरवळ येथील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : सुतारकाम करताना पडून गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय शंकर पांचाळ (वय ६०, रा. तरवळ, मायंगडेवाडी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. ८ जुलै २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

पांचाळ हे कुंभारवाडी येथे लक्ष्मण नारायण साळवी यांच्या घरात सुतारकाम करत असताना अचानकपणे ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने चिरायू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना निर्मल बालरुग्णालयात हलवण्यात आले होते.

डोक्याला झालेल्या जबर मारामुळे मेंदूला दुखापत झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली आहे.

Total Visitor Counter

2475258
Share This Article